प्रवेश सहावा
(बालवीर - शिक्षक )
बालवीर शिक्षक - सर्व बालवीर म्हणजे केवळ पोषाखी पोपट अशी टीका सर्वत्र ऐकू येते. तिच्यांत तथ्यहि आहे. कुणी हडेलहप्पी सरकारी अधिकारी यावा व त्याला यांनी ललकारी द्यावी, एवढंच जणूं यांचे काम ! पण मी हें सारं पालटणार आहें. बालवीर हा समाजाची सेवा करणारा वीर आहे. सेवाधर्माची, जनतेचें हित करण्याची त्यांना गोडी लागली पाहिजे. त्या दिवशी त्या खेडयांत जाऊन विहिरीभोंवती स्वच्छता वगैरे आम्हीं केली; तेव्हां गांवक-यांना आमच्याबद्दल कितीतरी कौतुक वाटलं! हल्लींच्या कॉल-याच्या दिवसांत नदीचे पाण पिण्यास नेऊं नये, म्हणून बालवीर तिथं निरोधन करतात; तेहि किती छान आहे! जाऊन पाहूं या तिकडे. पण एक अडचण आहे ! महारामांगांना निराळी विहीर नाहीं. नदीच पाण आम्ही त्यांना नेऊं देत नाही; काय करणार ! त्यांच्या भांडयांत हें औषण टाकून दिलं पाहिजे दोन दोन थेंब. तो नारायण, माहरांत जाऊन त्यांची सेवा करतो तशीच सा-यांनीं केली पाहिजे ! (शिट्टी वाजते, जातो.)