कुबेराचा मणिभद्र नावाचा एक मित्र होता. त्याचा पुत्र होता बडल, जो अत्यंत रूपवान आणि बलाढ्य होता. एक दिवस तो कुबेराच्या बगीच्याजवळ नलिनी नावाच्या सुंदरी जवळ गेला. तिथे त्याला नलिनीचे रक्षण करणाऱ्या रक्षकांनी रोखले तेव्हा बडलने आपल्या बळाने सर्व रक्षकांना मारून पळवून लावले. सगळे कुबेराकडे पोचले जिथे मणिभद्र देखील बसला होता. त्यांनी बडलची सारी हकीगत सांगितली. मणिभद्रने, नलिनीशी गैर व्यवहार केल्यामुळे बडलला शाप दिला कि तू नेत्रहीन होऊन क्षयरोगाने ग्रस्त होशील. शापाच्या प्रभावाने बडल पृथ्वीवर येऊन पडला. त्यानंतर मणिभद्र बडलपाशी आले आणि म्हणाले कि माझा शाप खाली जाणार नाही.
आता तू अवंतिका नगरात स्वर्गद्वारेश्वर च्या दक्षिणेला असलेल्या शिवलिंगाचे दर्शन कर. त्यामुळेच केवळ तुझा उद्धार होईल. मणिभद्र बडलला घेऊन अवंतिका नगरीला आले आणि इथे बडलने शिवलिंगाचे दर्शन घेतले. शिवलिंगाचा स्पर्श होताच त्याचा क्षय दूर झाला आणि तो पूर्वीसारखाच रूपवान आणि नेत्रवाला झाला. बडलच्या इथल्या पूजा आणि दर्शनामुळे हे शिवलिंग बडलेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले.
असे मानले जाते कि जो कोणी मनुष्य बडलेश्वर महादेवाचे दर्शन घेतो तो पृथ्वीवर सर्व सुखांचा उपभोग घेऊन मोक्षपदाला जातो. हे मंदिर भैरवगड मध्ये सिद्धवट च्या समोर आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel