जेव्हा द्रौपदीने ५ पांडवांची एक सामाईक पत्नी होण्याचे मान्य केले, त्यावेळी तिने अट घातली की ती स्वतःच्या घर - संसारात दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला सहभागी होऊ देणार नाही. याचाच दुसरा अर्थ असा, की त्या काळी असलेल्या परंपरेच्या अगदी विरुद्ध, पांडव त्यांच्या कोणत्याही अन्य पत्नीला इंद्र प्रस्थाला आणू शकत नव्हते. त्याही परिस्थितीत अर्जुन स्वतःची एक पत्नी इंद्र प्रस्थाला आणण्यात यशस्वी झाला. ती पत्नी म्हणजे श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा. आणि कृष्णाने दिलेल्या एक छोट्याश्या सल्ल्याचे पालन करून ती द्रौपदीच्या संसारात स्वतःचा शिरकाव करून घेण्यात यशस्वी झाली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.