४१ वर्षांच्या स्टेसी कास्टर ने २००५ मध्ये आपल्या दुसऱ्या पतीची हत्या केली. परंतु सांगताना ती एक आत्महत्या सांगितली. परंतु पोलिसी तपासात इथिनॉल ग्लेकॉल खायला घातले गेल्याची बाब उघड झाली. संशयावरून तिचा पहिला पती मायकेल वॉलेस याच्या मृत्यूचा तपास सुरु करण्यात आला. त्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असे सांगितले. परंतु पोलिसांनी त्याचे शव कबरीतून उकरून काढले आणि त्याची तपासणी केली तेव्हा इथिनॉल ग्लेकॉल मिळाले. स्टेसी कास्टर ने आपली किशोर वयातील मुलगी एश्ली हिच्यावर आपला पहिला आणि दुसरा पती यांच्या हत्येचा आरोप ठेवला. परंतु पहिल्या पतीच्या मृत्युच्या वेळी एश्ली केवळ ११ वर्षांची होती. सगळा खुलासा झाल्यानंतर स्टेसी कास्टर ला २५ वर्षांची शिक्षा झाली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.