अकबर राजपुतांबरोबर तहाचा मार्ग अवलंबत असे आणि लग्नाच्या माध्यमातून त्यांचे समर्थन मिळवत असे. १५६२ मध्ये त्याने जयपूरचा राजा बिहाल मल याच्या मोठ्या मुलीशी विवाह केला. १५८४ मध्ये त्याचा मुलगा सलीम याने राजा भगवान दास याच्या मुलीशी विवाह केला.
त्याने १५७६ मध्ये हल्दीघाट इथल्या लढाईत राजपूत राजा महाराणा प्रताप यांच्याशी युद्ध केले. एका घनघोर युद्धानंतर अकबराने महाराणा प्रताप यांचा पराभव केला. अकबराने १५८९ पर्यंत बंगाल, गुजरात, काश्मीर आणि काबूलवर आणि १५९५ पर्यंत कांदाहारवर कबजा केला. डेक्कन च्या दिशेने आगेकूच करताना त्याने अहमदनगर वर हल्ला केला आणि चांद बीबीने दाखवलेल्या शौर्यानंतरही त्यांना १५९६ मध्ये पराभूत केले.
असे म्हटले जाते की अकबर हिंदूंशी सहनशील धोरण राबवत असे. परंतु सूत्रांनुसार चित्तोर च्या लढाई नंतर २४ फेब्रुवारी १५६८ ला अकबराने ३०,००० हिंदू राजपुताना कैद करून ठार केले. याचा उल्लेख अकबराच्या दरबारातील इतिहासकार अबुल फजल यानेही केला आहे.
त्याने दीन-ए-इलाही नावाचा एक नवीनच धर्म चालू करण्याचा प्रयत्न केला, जो हिंदू आणि मुसलमान दोघानाही खुश करू शकेल, परंतु राजनैतिक कारणांमुळे तो त्यात अपयशी ठरला. अकबर हा एक यशस्वी राज्यकर्ता होताच, पण मोघल बद्शाहांमध्ये सर्वात शक्तिशाली होता.

सूत्र : https://www.quora.com/Who-was-the-greatest-Indian-warrior-in-the-history-of-India

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel