भगवान परशुराम एक महान योद्धा आणि गुरु होते. ते जन्माने ब्राम्हण होते, परंतु त्यांचा स्वभावधर्म क्षत्रियांचा होता. धर्म ग्रंथांनुसार परशुराम म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार होते. त्यांनी भगवान शंकराकडून अस्त्र शस्त्र विद्येचे अध्ययन केले होते. त्यांच्या वडिलांचे नाव जमदग्नी होते. त्यांच्या मातेचे नाव रेणुका होते. आपल्या वडिलांच्या हत्येचा बदल घेण्यासाठी त्यांनी २१ वेळा पृथ्वीवरून क्षत्रियांचा निर्वंश केला. भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण हे महामहीम योद्धे भगवान परशुरामांचे शिष्य होते.



कर्णाला शाप दिला
महाभारतानुसार कर्ण हा भगवान परशुरामांचा शिष्य होता. त्याने परशुरामांना स्वतःची ओळख एक सूतपुत्र म्हणून करून दिली होती. एकदा परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेऊन झोपी गेले होते. तेव्हा एक भ्रमर आला आणि त्याने करणाच्या मांडीला कुरतडायला सुरुवात केली. आपण काही हालचाल केली तर आपल्या गुरूंची झोपमोड होईल त्यामुळे कर्ण त्या वेदना शांतपणे सहन करत राहिला. भ्रमराने कर्णाच्या मांडीला खोलवर जखम केली. परंतु तरीही त्याने आपल्या गुरुना झोपेतून जागे केले नाही.
जेव्हा परशुराम उठले आणि त्यांनी हा प्रकार पहिला, तेव्हा त्यांनी विचार केला की एक ब्राम्हण पुत्र अशा प्रकारे भयंकर वेदना कधीच सहन करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी ओळखले की कर्ण सूतपुत्र नाही तर तो एक क्षत्रिय आहे. त्यामुळे आपल्या फसवणुकीमुळे क्रोधीत होऊन परशुरामांनी कर्णाला शाप दिला की जेव्हा तुला मी शिकवलेल्या विद्येची सर्वत्र जास्त आवश्यकता असेल, त्यावेळी तू सर्व विद्या विसरून जाशील. भगवान परशुरामांच्या या शापाच्या प्रभावामुळेच कर्णाचा मृत्यू झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel