एकदा भगवान शंकरांचा गण नुपूर हा इंद्राच्या सभेत पोचला. तिथे अप्सरा नृत्य करत होत्या. कामातुर होऊन नुपूरने उर्वशीला फूल मारले, ज्यामुळे उर्वशी क्रोधीत झाली. कुबेराने रागाने नुपुरला मृत्युलोकात पडण्याचा शाप दिला. तो पृथ्वीवर पडला. तेवढ्यात मनसा देवी प्रकट झाली आणि नुपूरला म्हणाली की तू महाकाल वनात जा आणि तिथे दक्षिण भागात असलेल्या शिवलिंगाचे दर्शन पूजन कर. नुपूर हे ऐकून त्वरेने महाकाल वनात गेला आणि शिवलिंगाचे दर्शन पूजन केले. शंकराने प्रसन्न होऊन सांगितले की नुपूर तुझे कल्याण होईल. नुपूरच्या पूजनामुळे हे शिवलिंग नुपुरेश्वर महादेवाच्या नावाने प्रसिद्ध झाले. असे मानले जाते की जो कोणी मनुष्य या शिवलिंगाचे दर्शन पूजन करतो तो सर्व रोग आणि दुःख यांपासून मुक्त होतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.