राजीव दिक्षित यांच्या प्रमाणेच लाल बहादूर शास्त्रीजी यांचा देखील रहस्यमय रीतीने हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ताश्केंत रशिया इथे त्या वेळी २ वाजले होते. आणि त्यांचा मृत्यू ताश्केंत घोषणा पत्रावर स्वाक्षरी केल्याच्या १ दिवस नंतर झाला होता. ते देशाचे पहिले पंत प्रधान होते ज्यांचा मृत्यू परदेशात झाला आणि त्यामुळेच लोकांना त्यांच्या मृत्यूबद्दल संशय आला.
त्याच बरोबर त्यांचे देखील शव परीक्षण झाले नाही आणि बातम्या येऊ लागल्या की त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. अनेक वर्षांनतर एक पत्रकार जॉर्ज क्रोव्ले याने आपले पुस्तक “कन्वर्सेशनस विथ द क्रो” मध्ये असा दावा केला की लाल बहादूर शास्त्री यांच्या ताश्केंत इथल्या मृत्यूला सी.आय.ए. जबाबदार होते.
क्रोव्ले ने सांगितले की अमेरिका भारताला, विशेषकरून लाल बहादूर शास्त्री यांच्या परमाणु धोरणाला घाबरला होता. ही घटना आजपर्यंत एक रहस्य बनून रहिली आहे.