रिजवानुर रहमान एक मध्यम वर्गीय कंप्यूटर ग्राफिक ट्रेनर होता ज्याने लक्स होसिएरी ग्रुप चे मालक अशोक तोडी यांची मुलगी प्रियांका हिच्यावर प्रेम केले आणि नंतर लग्न केले.
अशोक तोडी या विवाहामुळे अतिशय नाखूष होते आणि त्यांनी रिजवानुर याच्यावर दबाव आणला की त्याने प्रियांकाला आपल्या वडिलांकडे परत पाठवावे आणि पुन्हा कधीही तिच्याशी संपर्क करू नये. २१ सप्टेंबर २००७ ला कोलकता इथे रेल्वे रुळांवर एक प्रेत मिळाले. या प्रकरणाला आत्महत्येचे नाव देण्यात आले, परंतु लवकरच पोलिसांच्या आतल्या गोटातल्या बातम्या बाहेर आल्याने प्रसार माध्यमांत एकच खळबळ उडाली.
मे २०१० मध्ये कोलकता उच्च न्यायालयाने या प्रकरणाला हत्येचे नाव दिले आणि तपास पुन्हा सुरु झाला. कोर्टाने हत्येच्या प्रकरणा प्रमाणे वर्तणूक करणे मना केले, परंतु आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा खटला दाखल करण्यास सांगितले. हे प्रकरण अजूनही तपास अवस्थेतच आहे. असे म्हणतात की प्रियांकाचे वडील सामर्थ्यशाली असणे हे या प्रकरणाच्या निकालाला आणखीनच पेचात टाकणारे आहे.