माकन आणि त्याची पत्नी गीतांजली यांना दंगलीत सामील झाल्यामुळे हरजिंदर सिंह जिंदा, सुखदेव सिंह सुखा आणि रणजीत सिंह गिल यांनी माकन यांच्या घरासमोर ३१ जुलै १९८५ ला गोळ्या घालून ठार केले. तीनही खुनी गोळ्या घालत राहिले आणि माकन वाचण्याचा प्रयत्न करत राहिले. नंतर खूनी स्कूटर वरून पसार झाले.
नंतर पोलिसांनी सुखदेव सिंह सुखा याला १९८६ मध्ये, आणि हरजिंदर सिंह जिंदा याला १९८७ मध्ये अटक केली. दोघांना सेना अध्यक्ष अरुण श्रीधर वैद्य यांच्या मृत्यूला देखील जबाबदार मानून २ ऑक्टोबर १९९२ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. भारत सरकारच्या सांगण्यावरून रणजीत सिंह गिल याला अमेरिकेत १४ मे १९८७ ला अटक करण्यात आली आणि फेब्रुवारी २००० मध्ये भारतात परत पाठवण्यात आले. अनेक वर्षे खटला चालल्या नंतर २४ फेब्रुवारी २००३ रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.