हे पारसी समुदायाचे सर्वात जुने मंदिर आहे. ८व्या शतकात पारसी पर्शियाहुन येथे आले होते. ते पर्शियातील मुसलमान राजांच्या त्रासाला कंटाळून पवित्र अग्निसोबत भारतात आले होते. या मंदिरात विशेष असे काहीही नाही पण या मंदिरातील अग्नि १२५० सालांपासून अहोरात्र पेटत आहे. हेच या मंदिराचे वैशिष्ठ आहे. जेव्हा पारसी भारतात आले त्यावेळी आपल्या अग्निला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी अग्नि या जागेवर प्रस्थापित केली. १८व्या , ९१व्या शतकात पारसी लोकांनी ही अग्नि अताश बहराम या ठिकाणी स्थापित केली. या मंदिरातील काही गोष्टी गुप्त ठेवण्यात आल्या आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.