एकदा पार्वतीने शंकराला विचारले की या सृष्टीतील सर्व चराचर, जे डोळ्यांना दिसते आणि कानांना ऐकू येऊ शकते ते ते सर्व तुम्ही उत्पन्न केलेले आहे. त्याच बरोबर संपूर्ण जग तुमच्यातच लीन होते. यावर शंकर म्हणाले की प्रलयाच्या वेळी महाकाल वनात मी हे धारण केलेले आहे. त्याचे नाव महालयेश्वर आहे.
या शिवलींगातून ब्रम्हा, विष्णू, देवी, देवता, भूत, बुद्धी, प्रज्ञा, धृती, ख्याती, स्मृती, लज्जा, सरस्वती सर्व उत्पन्न झाले आहेत आणि प्रलयाच्या वेळी सर्व याच्यातच लीन होतात. अशी मान्यता आहे की जो कोणी या शिवलिंगाचे पूजन करतो तो त्रिलोकात विजयी होतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.