श्री इन्द्रद्युम्नेश्वर महादेवाच्या स्थापनेची कथा शुभ तसेच निष्काम कर्म करणे आणि पुण्यार्जन यांचे महत्त्व दर्शवते. प्रस्तुत कथा असा दर्शवते की पृथ्वीवर पुण्य कर्म केल्यामुळेच कीर्ती आणि स्वर्ग प्राप्ती शक्य आहे. पौराणिक कथांनुसार प्राचीन काळी एक इंद्र्द्युम्न नावाचा राजा होऊन गेला. राजाने आपल्या आयुष्यात पृथ्वीवर अनेक पुण्य कर्म केली ज्यामुळे त्याला स्वर्ग प्राप्त झाला. परंतु काही काळानंतर जेव्हा राजाचे पुण्य क्षीण झाले तेव्हा तो पुन्हा पृथ्वीवर येऊन पडला. त्येव्हा दुःख आणि राग अशा संमिश्र भावना त्याच्या मनात दाटून आल्या. आणि त्याला एक गोष्ट समजली की स्वर्गाचा लाभ केवळ पुण्यसंचय असेपर्यंतच राहतो. पृथ्वी लोकात केलेली पुण्या कर्माच स्वर्ग मिळवून देतात. चांगल्या कामांनीच पुण्य मिळते आणि मनुष्याची कीर्ती सर्वदूर पसरते. तर दुसरीकडे वाईट कृत्य केल्याने निंदा होते आणि दुःख भोगावे लागते.


हे समजताच राजाने पुन्हा तप करण्याचा निश्चय केला आणि तो हिमालयाकडे निघाला. तिथे राजाला महामुनी मार्कंडेय ऋषी भेटले. राजाने त्यांना प्रणाम केला आणि विचारले की कोणते तप केल्याने स्थिर स्वरुपाची कीर्ती प्राप्त होईल? मार्कंडेय ऋषींनी राजाला सांगितले की तू महाकाल वनात जा, तिथे जाऊन कलकलेश्वर महादेवाच्या जवळच एक दिव्य शिवलिंग आहे, त्याचे दर्शन पूजन कर. तसे केल्याने अक्षय कीर्ती प्राप्त होते.
तेव्हा राजा महाकाल वनात गेला आणि त्याने त्या दिव्य शिवलिंगाचे भक्तिभावाने पूजन दर्शन केले. तेव्हा देवता आणि गंधर्व राजाची स्तुती करू लागले आणि म्हणाले की या शिवलिंगाच्या पूजनाने तुझी कीर्ती निर्मल झाली आहे. आजपासून तुझ्या नावावरूनच हे शिवलिंग इंद्रद्युम्नेश्वर महादेव या नावाने ओळखले जाईल.मान्यता आहे की जो कोणी मनुष्य इंद्रद्युम्नेश्वर महादेवाचे दर्शन पूजन करेल त्याला स्वर्ग प्राप्त होईल. त्याला यश आणि कीर्ती मिळेल आणि त्याच्या पुण्यात वृद्धी होईल. उज्जैन मधील ८४ महादेव मंदिरांपैकी एक असलेले श्री इंद्रद्युम्नेश्वर महादेव मंदिर मोदी गल्लीत उभे आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel