जीवनाची उत्पत्त्ती आणि विकास यांचे अध्ययन करून आपण जीवनासाठी आवश्यक असलेल्या घटकांची यादी तयार करू शकतो. बुद्धिमान जीवनासाठी खालील गुणधर्म आवश्यक आहेत -
    पर्यावरणाची जाणीव करून देणारे डोळे किंवा तत्सम एखादे तांत्रिक तंत्र
    कोणतीही वस्तू पकडण्यासाठी अंगठा आणि पंजा यांसारखी यंत्रणा
    बोलण्याच्या शक्तीसारखी संभाषण प्रणाली


या  गोष्टी पर्यावरणाशी जमवून घेण्यासाठी आणि वागण्यासाठी अत्यावश्यक आहेत आणि हे गुण बुद्धिमत्तेची ओळख आहेत. परंतु या तीन गुणांच्या व्यतिरिक्त देखील आणखी काही गुणधर्म असू शकतात जे अनिवार्य नाहीत. यामध्ये आकार, रूप किंवा सममिती समाविष्ट नाहीत, बुद्धिमान जीवन कोणत्याही आकार, रूप, रंग किंवा सामामितीचे असू शकते. हे गरजेचे नाही की परग्रही जीव हा सिनेमात दाखवतात तशाच आकाराचा असला पाहिजे. लहान मुलांसारखे, किड्यांचे डोळे असलेले परग्रही जे आपण टीव्ही आणि सिनेमात पाहतो ते १९५० मधल्या बी ग्रेड चित्रपटात दाखव्लेलता परग्रही प्रण्यांसारखेच आहेत आणि तेच आपल्या मनात बसलेले आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel