हे रामायण काळाच्या काही काळअगोदरचे हेहेया साम्रार्ज्याचे राजा होते. त्यांचे प्रमूख पंडीत रावणाचे पणजोबा पुलस्त्थ होते. त्यांना सप्तर्षी जमदग्निंकडून एक गाय हवी होती. त्यांनी नकार दिल्यावर त्याने जमदग्निंना जीवे मारले ज्याचा बदला हा त्यांचा पुत्र परशुराम याने घेतला.
रावणाने त्यांचं राज्य जिंकायचा प्रयत्न केला पण सहस्त्रार्जुनाने रावणाला एका साखळीने बांधून ठेवलं आणि फक्त त्याच्या पणजोबांच्या सांगण्यावरूनच सोडलं. ते एक खलनायक असूनही अनेक पुराणांमध्ये त्यांची स्तुती केली गेली आहे. मध्यप्रदेश आणि गुजरातचे यादव आजही त्यांची पूजा करतात आणि त्यांच्या नावे अनेक मंदिरं निर्माण केली आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.