पार्वतीने खेळता खेळता सहज जेव्हा शंकराचे डोळे झाकले तेव्हा त्याचा जन्म झाला. सर्वत्र अंधार झाला आणि अंधकाचा जन्म झाला. शंकराने अंधकाला हिरन्य्नेत्रला दिलं ज्याचा लवकरच मृत्यू झाला. अंधक राजा झाला पण त्याच्या भावांनी त्याची सत्ता हिरावून घेतली. त्याने ब्रह्माची तपस्या केली. ब्रह्माने त्याला ताकद, सौंदर्य आणि दृष्टी दिली आणि त्याला वर दिलं की जेव्हा तो एका मातृरूपी स्त्रीकडे आकर्षित होईल. आता शक्तिशाली झाल्याने अंधकाने आपल्या भावांना हरवले. त्याने देवतांनाही हरवून स्वर्गावर ताबा मिळवला. एके दिवशी अंधकाच्या सेनापतिने पार्वतीला बघून त्याच्याकडे तिच्या सौंदर्याचे कौतुक केले. अंधकाला ती स्त्री हवी होती. याच कारणासाठी अंधकाने शंकराला युद्धासाठी आव्हान दिले. एका भीषण युद्धानंतर शंकराने अंधकाचा वध केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.