हे खूपच कमी लोकांना माहिती असेल कि शकुनी जवळ द्यूत
खेळण्यासाठी जे फासे होते ते त्यांच्या माता आणि पित्याच्या मणक्याच्या
हाडापासून बनवलेले होते. आपल्या पित्याच्या मृत्यू नंतर शकुनीने त्यांची
काही हाडे आपल्या जवळ ठेवलेली होती. शकुनी जुगार खेळण्यात पारंगत होता आणि
त्याने कौरवांना देखील त्याचा नाद लावला होता.
शकुनीच्या या चालीमागे
केवळ पांडवांचाच नाही तर कौरवांचा देखील भयंकर विनाश लपलेला होता, कारण
शकुनीने कौरव वंशाच्या नाशाची प्रतिज्ञा केली होती आणि त्यासाठी
दुर्योधनाला आपल्या मोहरा बनवले होते. शकुनी प्रत्येक वेळी केवळ संधीची वात
पाहत असायचा, ज्यामुळे कौरव आणि पांडवांमध्ये भयंकर युद्ध झाले आणि
कौरवांचा नाश झाला.
जेव्हा युधिष्ठीर हस्तिनापुराचा युवराज म्हणून घोषित
झाला, तेव्हा शाकुनिनेच लक्षागृहाचे षड्यंत्र रचले आणि सर्व पांडवांना
वारणावत मध्ये जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. शकुनी कोणत्याही
परिस्थितीत दुर्योधनाला हस्तिनापूरचा राजा करू इच्छित होते जेणे करून
त्यांचे त्याच्यापर संपूर्ण पणे मानसिक आधिपत्य बनून राहील आणि मग त्या
मूर्ख दुर्योधनाच्या सहाय्याने भीष्म आणि कुरुकुलाचा विनाश करता येईल,
शाकुनिनेच दुर्योधनाच्या मनात पांडवांच्या बद्दल वैरभाव जागा केला आणि
त्याला सत्तेच्या लालसेत गुंतवून ठेवले.