एक सर्बियाई अमेरिकी आविष्कारक, भौतिक वैज्ञानिक, यांत्रिक अभियंता, विद्युत अभियंता आणि भविष्यकार होते. थॉमस एडीसन च्या शोधांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. टेस्ला चा जन्म १० जुलै १८५६ ला ऑस्ट्रियन स्टेट (आता क्रोएशिया) मध्ये झाला होता. पुढे त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. त्यांच्या बद्दल बोलताना असे म्हटले जाते की एक व्यक्ती जिने पृथ्वी प्रकाशमय केली. टेस्ला यांना त्यांच्या आधुनिक प्रत्यावर्ती धारा (ए सी) विद्युत अपूर्ती प्रणाली च्या क्षेत्रातील अभूतपूर्व योगदाना मुले विशेष करून ओळखण्यात येते. टेस्ला यांची विविध पेटेंट आणि सैद्धांतिक कार्य बिनतारी संचार, आणि रेडियो च्या विकासाचा आधार ठरले आहेत. विद्युत चुंबकीय क्षेत्रात त्यांनी केलेले क्रांतिकारी विकास कार्य हे मायकल फेराडे याच्या विद्युत प्रयोगांच्या सिद्धांतांवर अद्धारीत होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.