काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, एका मित्रासोबत माझे मतभेद झाले. प्रत्येक गैरसमज जसा होतो तशीच ही गोष्ट देखील अचानक आणि अतिशय पटकन घडली. हकीकत अशी होती की माझा मित्र मला त्याच्यासोबत एका नेटवर्किंग व्यवसायात जॉईन करण्यासाठी माझे मन वळवण्याचा प्रयत्न करत होता, ज्यामध्ये मी त्याला अनेक वेळा नम्रपणे नकार देण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार अनेक दिवस चालू होता, तरीही मी तो सहन करत होतो. पुढे पुढे माझा मित्र हा मित्रासारखा कमी आणि एखाद्या सेल्समन सारखा जास्त वागायला लागला. आणि अशातच तो मला असे काहीतरी बोलला की मला तो माझा अपमान वाटला आणि माझ्या संयमाचा बांध सुटला. मी लगेच रागाने त्याला उलट सुलट बोलून तिथून निघून गेलो. त्यावेळी मला वाटलं की मी जे केलं ते बरोबरच केलं आहे, परंतु नंतर डोकं शांत झाल्यावर मला जाणीव झाली की मी त्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला आणि घाई करून त्याला नाही नाही ते बोलून बसलो.
अर्थात नंतर मी या गोष्टीसाठी त्याची माफी मागितली, परंतु तरीही मनाला ही रुखरुख लागुनच राहिली की ही एक मोठी चूक होती आणि त्यामुळे आमची मैत्री कदाचित तुटूही शकली असती.
तेव्हा रहीम कवीचा दोहा पुन्हा पुन्हा आठवत होता
रहिमन धागा प्रेम का मत तोड़ो चटकाय,
टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गांठ पड़ जाय।
या घटनेतून मी एक गोष्ट शिकलो की आपण स्वतःला आणि स्वतःच्या चुकांना माफ करण्यासाठी काही गोष्टी या अतिशय सहाय्यक असतात. याच गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.