स्वतःला माफ करण्यासाठी आधी हे जाणून घेणे गरजेचे असते की आपण नक्की काय केले आहे. आपल्या सोबत घडलेल्या घटनेला विस्तारपूर्वक लिहून काढा आणि त्या गोष्टी देखील लिहून काढा ज्यांची ती घटना घडण्याला मदत झाली आहे. दुसऱ्या व्यक्तीला आणि परिस्थितीला दोष देणे यापासून स्वतःला परावृत्त करा आणि केवळ स्वतःवर लक्ष केंद्रित करा. कदाचित असे करताना तुम्हाला अस्वस्थ वाटू शकेल.
माझ्या बाबतीत मी केवळ माझ्या मित्राचा आक्रमक व्यवहाराच पाहू शकलो आणि स्वतःच्या प्रतिक्रियेला योग्य मानले. परंतु संपूर्ण घटना विस्तारपूर्वक लिहून काढून तिचा अभ्यास केल्यावर आणि फक्त माझ्या वागण्यावर लक्ष केंद्रित केल्यावर मला जाणीव झाली की मी त्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊन निर्णय घेतला होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.