गरुड पुराणात एकोणीस हजार श्लोक होते असे म्हटले जाते, परंतु आत्ता एकूण सात हजार श्लोकच उपलब्ध आहेत. या पुज्रानाला २ भागांत ठेवून पाहिले पाहिजे. पहिल्या भागात विष्णू भक्ती आणि उपासनेच्या विधींचा उल्लेख आहे आणि मृत्यू नंतर गरुड पुराणाच्या पठणाचा उल्लेख आहे. दुसऱ्या भागात 'प्रेतकल्पा'चे वर्णन असून विभिन्न नरकात जीवाच्या जाण्याचे वृत्तांत आहेत.
यामध्ये मृत्यू नंतर मनुष्याची काय गत होते, त्याचा कोणत्या प्रकारच्या योनीत जन्म होतो, प्रेत योनीतून मुक्ती कशी मिळू शकते, श्राद्ध आणि पितृ कर्म कशा प्रकारे करावीत, तसेच नरकातील दारूण दुःखापासून मोक्ष कसा प्राप्त करता येऊ शकतो या सर्व विषयांचे विस्तृत वर्णन प्राप्त होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.