" मृत्यू नंतर काय होते?" हा एक प्रश्न असा आहे ज्याचे उत्तर जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. सर्व जन आपापल्या पद्धतीने त्याचे उत्तरही देतात. गरुड पुरांह देखिल याच प्रश्नाचे उत्तर देते. जिथे धर्म शुद्ध अबी सत्य आचरणावर भर देतो, तिथे पाप-पुण्य, नैतिकता-अनैतिकता, कर्त्तव्य-अकर्त्तव्य आणि त्यांची] शुभ-अशुभ फळे यांचा देखील विचार करतो.
तो याला तीन अवस्थांमध्ये विभाजित करतो. प्रथम अवस्थेमध्ये मानवाला त्याच्या समस्त चांगल्या आणि वाईट कर्मांचे फळ याच जीवनात प्राप्त होते. दुसऱ्या अवस्थेत मनुष्य मृत्यू नंतर विभिन्न ८४ लाख योनिंपैकी आपल्या कर्मानुसार कोणा एका योनीत जन्म घेतो. तिसऱ्या अवस्थेत तो आपल्या कर्मानुसार स्वर्गात किंवा नरकात जातो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.