काही लोकांमध्ये अशी ठाम समजूत आहे की हे गरुड पुराण सारोद्धार (प्रेतकल्प) घरात ठेवता कामा नये. केवळ श्राद्ध इत्यादी प्रेत कार्यांमध्येच त्याची कथा ऐकतात. ही कल्पना अत्यंत भ्रामक आणि अंधश्रद्धा युक्त आहे. कारण या ग्रंथाच्या महिमेतच ही गोष्ट लिहिलेली आहे की 'जो मनुष्य या गरुड पुराण सारोद्धार चे पठाण करतो किंवा ऐकतो, तो यमराजाच्या भयंकर यातानांना मोडून निष्पाप होऊन स्वर्गात जातो.
हा ग्रंथ अतिशय पवित्र आणि पुण्यदायक आहे, तसेच सर्व पापांचा विनाश करणारा आणि ऐकणार्यांच्या सर्व कामना पूर्ण करणारा आहे. त्याचे नियमित श्रवण केले पाहिजे - पुराणं गारुडं पुण्यं पवित्रं पापनाशनम्। श्रृण्वतां कामनापूरं श्रोतव्यं सर्वदैव हि।। (सारो. फलश्रुति 11) गरुद्पुराण सारोद्धार चे श्रवणरूपी और्ध्वदैहिक कृत्य पितरांना मुक्ती प्रदान करणारे, पुत्रविषयक अभिलाषा पूर्ण करणारे, तसेच या लोकांत आणि परलोकात सुख प्रदान करणारे आहे.
जो हे पवित्र प्रेतकल्प ऐकतो किंवा वाचतो तो सर्व पापांतून मुक्त होतो आणि कधीही दुर्गातीला प्राप्त होत नाही. यामुळेच समस्त प्रेतकल्प विशेष प्रयत्न करून ऐकले पाहिजे -
इदं चामुष्मिकं कर्म पितृमुक्तिप्रदायकम्।
पुत्रवांछितदं चैव परत्रेह सुखप्रदम्।।
प्रेतकल्पमिदं पुण्यं श्रृणोति श्रावयेच्च य:।
उभौ तौ पापनिर्मुक्तौ दुर्गतिं नैव गच्छत:।।
तस्मात् सर्वप्रयत्नेन श्रोतव्यं गारुडं किल।
धर्मार्थकाममोक्षाणां दायकं दु:खनाशनम्।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.