सूर्य आपल्या किरणांच्या उष्णतेने समुद्राचे पाणी अवशोषित करतो. परंतु पुन्हा त्याची पृथ्वीवर बरसात करतो. त्याच प्रकारे एका साधकाने विषयांचा भोग घेतल्यानंतर ठराविक काळाने त्यांचा त्याग केला पाहिजे.
श्रीमद् भागवत पुराणात १२ स्कंध आहेत. त्यामध्ये पायापासून ढोपरापर्यंत पहिला स्कंध, ढोपर ते कंबर दुसरा, नाभी तिसरा, उदार चौथा, हृदय पाचवा, बाहू आणि कंठ सहावा, मुख सातवा, डोळे आठवा, कपाळ आणि भुवया नववा, ब्रह्मरन्ध्र दहावा, मन अकरावा आणि आत्म्याला बारावा स्कंध म्हटले गेले आहे. अशा प्रकारे आपले संपूर्ण शरीरच भागवतमय आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.