अर्थात हे सर्व दृष्टांत भगवान कृष्णाद्वारे अवधूतोपाख्यान मध्ये एका साधकाच्या अनुपालनासाठी सांगण्यात आले होते, जे हजारो वर्षांपूर्वी रचित पुराणांत मिळतात, तरी देखील त्यांची प्रासंगिकता आज देखील कमी झालेली नाही. वाढत चाललेल्या उपभोक्तावादी संस्कृतीमध्ये भौतिक सुखाच्या साधनांच्या मागे धावणाऱ्या मनुष्यासाठी हे कथित सुख एखाद्या मृगजळा पेक्षा कमी नाही. त्याचा अंत देखील घोर निराशा, तणाव, मानसिक क्लेश एवढेच नव्हे तर विक्षिप्तावस्थेत देखील होत आहे. त्यामुळे विषय वासना यांच्यापासून अलिप्तता, तसेच त्याग आणि संतोष यांची शिकवण देणारे हे 'गुरुजन' आपल्याला स्थायी सुख आणि शांतीचा मार्ग दाखवतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.