साधुबोधा झाला तो नुरोनिया उरुण अनुभवासकट ठायींच मुरतो
साधुबोध झाला नुरोनिया ठेला । ठायींच मुराला अनुभव ॥१॥
ठायींच समाप्ति झाली त्यावेळी कापुरांची ज्योति पेटली.
कापुराची वाती उजळली ज्योती । ठायीच समाप्ती झाली जैशी ॥२॥
मोक्षरेखेवर आलेला साधुचा अंकित असा हरिभक्त भाग्यवान होतो.
मोक्षरेखें आला भाग्यें विनटला । साधुचा अंकिला, हरिभक्त ॥३॥
सत्संगाच्या गोडीनें, सत्समागमानें, जनीं वनीं, आत्मतत्वीं हरीच दिसुं लागला
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी । हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्वीं ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.