संतसंगतीत मनोमार्गानें श्रीपति आकलन होतो.

संताचे संगति मनोमारों गती । आकळावा श्रीपति येणे पंथे ॥१॥

रामकृष्ण वाचेचा भाव हा जीवांचा भाव असुन शिवाचा रामजप हा आत्मा.

रामकृष्ण वाचा भाव जीवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥२॥

एकतत्वी नामच अद्वैताचें साधन

एकतत्वी नाम साधितो साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥

नामामृताची गोडी वैष्णवांनीं चाखली असुन योग्यांनी जीवनकळा साधिली.

नाममृत गोडी वैष्णवां लाधली । योगिया साधली जीवनकळा ॥४॥

प्रल्हादाचे ठिकाणी नामोच्चार बिंबला असुन उद्धवाला कृष्णदाता लाधला

सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥

नाम हे जितकें सुलभ तितकेचा दुर्लभ आहे

ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel