तीर्थ व्रतांची भावाविना सिद्धी साधणें ही उपाधी होय.
तीर्थव्रतनेम भावेविण सिद्धी । वायांचि उपाधि करिसी जना ॥१॥
भावेविण नाकळे
भावबळें आकळे येरवीं नाकळे । करतळीं आवळे तेसा हरी ॥२॥
परोपरी यत्न करण्यासारखे हे साधन आहे.
परीयाचा रवा घेतां भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥
निवृत्तीनाथांनी संपुर्ण निगुण ज्ञानेश्वर महाराज यांचें हातीं दिलें आहे.
ज्ञानदेव म्हणें निवृत्ती निर्गुण । दिधले संपुर्ण माझें हातीं ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.