नामोच्चारांत जाणीव नेणीव लयास जाणें याचें नांव मोक्ष.
जाणीव नेणीव भगवंती नाहीं । उच्चारणी पाही मोक्ष सद्दा ॥१॥
जेथे कळिकाळाच रीव नही तोच नारायण हरि नामोच्चर
नारयण हरि उच्चार नामाचा । तेथें काळीकाळाचा रीघ नाहीं ॥२॥
सर्वव्यापी भगवंतंचे प्रमाण वेदांनांही कळले नाहे, मग तें जीव जंतुना कोठुन कळणार ?
तेथील प्रमाण नेणवे वेदाशीं । ते जीवजंतुसी केवि कळे ॥३॥
या अभ्यासाचें फळ नारायणापाठ असुन त्या योगानें ज्ञानेश्वर महा राजांनी सर्वत्र वैकुंठ केले.
ज्ञानदेवा फळ नारायणपाठ । सर्वत्र वैकुठ केले असें ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.