सर्व सुखाची गोडी साही शास्त्रांत निवड आणि अर्धघडीही रिकाम राहुं नको.

सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहुं नको ॥१॥

लटिका व्यवहार हाच सर्व संसार असुन हरिवांचुन येरझार फुकट

लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥२॥

रामकृष्णी संकल्पात्मक नाममंत्रजपाच्या कोटींने पाप जाईलच

जाईल नाममंत्रजप कोटी जाईल पाप । रामकृष्णी संकल्प धरुनि राहे ॥३॥

सर्व माया तोडली असतां निजवृत्ति रहाते म्हणुन इंद्रियांच्या सवडीत विषयरुप होऊन लपु नकोस

निजवृत्ति काढी सर्व माया तोडी । इंद्रिया सवडी लपुं नको ॥४॥

तीर्थव्रतांचे ठिकाणी भाव धरून, करुनायुक्त होऊन, दया व शांति या गुणांने हरीला आपलासा कर.

तीर्थव्रतीं भाव घरी रे करुना । शांती दया पाहुना हरि करी ॥५॥

निवृत्तिदेवी ज्ञान हेंच महाराजांना प्रमाण असुन हरिपाठ हा समाधेसर्ज वन आहे.

ज्ञानदेव प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel