कलियुगात मनुष्याचे मन भौतिक सुखांत इतके हरवून जाते की तो सत्याची न्यूनतम अट देखील पूर्ण करू शकत नाही. मोक्ष प्राप्त करण्यासाठी सतयुग, द्वापरयुग आणि त्रेतायुगात जिथे कठीण तपश्चर्या आणि यज्ञ अनुष्ठान करावे लागत होते, तिथे कलियुगात केवळ शुद्ध मानाने केलेले देवाचे नामस्मरणच कल्याणकारी फळ देते.
परंतु ही छोटीशी अट देखील इतकी सोपी नाहीये आपण कलियुगातील मनुष्यांसाठी. आपल्याला काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह यांनी अशा प्रकारे ग्रासलेले आहे की सत्य ना दिसते, ना ऐकू येते, आणि ना वाणीतून बाहेर पडते. दुनियादारीच्या नावावर आपण सत्यापासून लपून राहण्यातच समजुतदारपणा आणि चलाखी मानतो.
म्हणूनच ज्या व्रतकथेचे महात्म्य आपण एवढ्या वेळा ऐकतो, ती काही कोणती कथा नाही तर सत्याच्या म्मुर्त अमूर्त स्वरुपात अखंड विश्वास आणि आस्था ठेवणे आणि मन, वचन आणि कर्मांनी सत्यावर अवलंबित जीवनशैली आणि व्यवहार राबवणे आहे. "सत्याची आस" हा प्रचार आपल्या पुरोहितांच्या हिताचा नसल्याने आपण नेहमी "कथेची कथा"च ऐकत आलो आहोत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel