https://s-media-cache-ak0.pinimg.com/236x/3d/5c/af/3d5caf9f72ed1de110e2391b472364ed.jpg

भारतात अदितीच्या पूजनाची प्रथा होती, परंतु आता ती नाहीये. देवतांच्या मातेचे नाव अदिती आहे. अदितीच्या पुत्रांना आदित्य म्हटलेले आहे. ३३ देवतांमध्ये अदितीचे १२ पुत्र सामील आहेत ज्यांची नावे अशी आहेत - विवस्वान्, अर्यमा, पूषा, त्वष्टा, सविता, भग, धाता, विधाता, वरुण, मित्र, इंद्र आणि त्रिविक्रम (भगवान वामन). १२ आदित्य आणि ८ वसू, ११ रुद्र आणि २ अश्विनीकुमार मिळून ३३ देवतांचा एक वर्ग आहे.
समस्त देव कुळाला जन्म देणारी माता अदिती ही देवींची देखील माता आहे. अदितीला लोकमाता देखील म्हटले गेले आहे. अदितीचे पती ऋषी कश्यप हे ब्रम्हदेवाचे मानसपुत्र मरीची यांचे विद्वान पुत्र होते. मान्यता आहे की त्यांना अनिष्टनेमी या नावाने देखील ओळखले जाते. यांची माता 'कला' ही कर्दम ऋषींची कन्या आणि कपिल देवाची बहीण होती.
अदितीचा पुत्र विवस्वान याच्यापासून मनु चा जन्म झाला. महाराज माणू यांना इक्ष्वाकु, नृग, धृष्ट, शर्याति, नरिष्यन्त, प्रान्शु, नाभाग, दिष्ट, करुष आणि पृषध्र नावाच्या १० श्रेष्ठ पुत्रांची प्राप्ती झाली. उल्लेखनीय आहेकी विवस्वानालाच सूर्य म्हटले गेले आहे ज्यांची आकाशातील सूर्य ग्रहाशी तुलना केली गेली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel