अहिरावण हा रावणाचा मित्र होता. तो पाताळात राहत होता. रावणाच्या सांगण्यावरून त्याने भगवान रामाच्या युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मण दोघांचे अपहरण केले. दोघांना तो पाताळात घेऊन गेला आणि तिथे त्याने दोघांनाही बंदी बनवले. त्यांच्या अपहरणाने वानर सेना भयभीत आणि शोकाकूल झाली. परंतु बिभीषणाने हनुमानाला अंदाज दिला की हे अपहरण कोणी केले असावे. तेव्हा हनुमान राम आणि लक्ष्मणाला सोडवायला पाताळात गेला. तिथे त्याने पहिले की त्याच्यासारखाच दिसणारा एक बालक तिथे पहारा देत आहे. त्याचे नाव मकरध्वज होते. मकरध्वज हनुमानाचाच पुत्र होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.