- गुरु वसिष्ठ यांच्याकडून शिक्षण
- दीक्षा घेणे
- विश्वामित्रांच्या सोबत वनात ऋषींच्या यज्ञाचे रक्षण करणे आणि राक्षसांचा वध
- राम स्वयंवर
- शिवधनुष्य तोडणे
- वनवास
- केवटाशी भेट
- लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापणे
- खर आणि दूषण यांचा वध
- लक्षणाचे लक्ष्मण रेषा काढणे
- सुवर्ण हरण - मारीच राक्षसाचा वध
- सीता अपहरण, जटायूशी भेट.
- कबन्ध वध
- शबरीशी भेट
- हनुमानाशी भेट
- सुग्रीवाशी भेट
- दुंदुभी आणि वालीचा वध
- सम्पातीने सीतेचा पत्ता सांगणे,
- अशोक वाटिकेत हनुमानाचे सीतेला रामाची अंगठी देणे
- हनुमानाकडून लंका दहन
- रामसेतूचे निर्माण
- लंकेत रावणाशी युद्ध
- लक्ष्मण मूर्च्छित होणे
- हनुमानाचे संजीवनी आणणे
- रावणाचा वध
- पुष्पक विमानाने अयोध्येत आगमन.
वनवासाच्या दरम्यान राम कुठे कुठे राहिला? : रामायणात उल्लेख असल्या प्रमाणे आणि अनेक संशोधाकांनुसार जेव्हा भगवान रामाला वनवास झाला, तेव्हा त्याने आपला प्रवास अयोध्येपासून सुरु करून नंतर रामेश्वरम आणि शेवटी श्रीलंका इथे समाप्त केला. या दरम्यान त्याच्यासोबत जिथे जिथे जे जे काही घडले, त्यांच्यापैकी २०० पेक्षा अधिक घटनास्थळांची ओळख पटलेली आहे.
प्रख्यात इतिहासकार आणि पुरातत्त्ववादी संशोधक डॉ. राम अवतार यांनी सीता आणि रामाच्या जीवनातील घटनांशी निगडीत अशा २०० पेक्षा देखील अधिक स्थानांचा शोध लावला आहे, जिथे आज देखील त्यासंबंधी स्मारक विद्यमान आहे, जिथे श्रीराम आणि सीता थांबले होते. तेथील स्मारके, भित्तीचित्र, गुहा, इत्यादी स्थानांच्या काळाचा पडताळा वैज्ञानिक पद्धतीने करण्यात आला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.