चारोळीगाथा
चारोळीच्या विचाराने
ठणकतोय माथा,
डोक्यात फक्त एकाच विचार
चारोळीगाथा, चारोळीगाथा.
*************************************************
आस
क्षितिजापल्याड झेपावण्याची आस
स्वस्थ बसू देतच नाही,
मी रोज घेतो भरारी तरी
मन शांत होतच नाही.
*************************************************
प्रश्न
मंत्र्या- संत्र्यांच्या पार्ट्यात
मोठा असतो जश्न
कित्येक मंत्री येऊन गेले तरी
शेतकऱ्यांचा सुटला नाही प्रश्न.
*************************************************
हमी
सुशिक्षित बेकारांची
इथे काही कमी नाही
M.B.A, M.C.A करूनही
नौकरीची हमी नाही.
*************************************************
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.