सागर

अथांग असा हा सागर
कसा शिस्तीत खवळतोय
आणी भरती- ओहोटीची एक ओढ
त्याला बेशिस्त करून जाते.

*************************************************

नशिब

आस  आहे उडण्याची
पण पंख मात्र फुटलेच नाही
नशिबच फुटकं निघालं
कारण मनुष्याला पंखच नाही.

*************************************************

इच्छा.

पैसे कमाविण्याची धडपड
श्रीमंत होण्याची इच्छा,
काय कराल मोठा बेड घेऊन
जेव्हा झोपायचीच नसेल इच्छा.

*************************************************

हाथ

ओंजाळनारा हाथ मायेच
आखडता कधीच घेऊ नका,
प्रेमासाठी तडफडेल असा
श्राप कुणाला देऊ नका.

*************************************************

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel