इथे हसावं लागतं

ह्या दुनियात राहून
प्रत्येक रहस्याला लपवावं लागतं,
हृदयात कितीही दुःख असो
परंतु इथे हसावं लागतं

*************************************************

मराठी माती.

विझलाय दिवा, जळाल्या वाती
केवढे धर्म अन केवढ्या जाती,
शिवरायांचे पुत्र आम्ही नाही मानत जात-पात
आमच्या रक्तात फक्त मराठी माती, मराठी माती.

*************************************************

धर्म

आपलेपणाची ओढ, जीव लावण्याची खोड
प्रेमाने भरतो घडा अंतकरणाचा,
चार क्षणाचा जीव, करावी त्याची कीव
पाळत जावा धर्म माणुसकीचा.

*************************************************

खैरात

किती हे वादे अन,
किती हि आश्वासनांची खैरात.
या स्वार्थी राजकारण्यांची आता,
काढलीच पाहिजे वरात..

*************************************************

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel