मोक्ष

सगळ्यांना हवाय पैसा
नात्यांकडे कुणाचं लक्ष नाही.
पैश्याची हाव सुखाने जगू देत नाही
आणी मेल्यावरही कुणाला मोक्ष नाही.

*************************************************

देव

साधू- बाबा- ढोंगीचे
फुटले समाजात पेव
चला उठा तरुणांनो
दाखवुया यांना देव.

*************************************************

परिश्रम

परिश्रमाची कास धरा
लबाडीला अर्थ नाही,
श्रमाचे फळ नक्कीच मिळेल
कुणाचेच परिश्रम व्यर्थ नाही.

*************************************************

बळी

जन्म मनुष्याचा मिळालाय
हैवानासारखे जगु नका.
जिभेचे चोचले पुरवायल
प्राण्यांचे बळी घेऊ नका.
*************************************************

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel