इंदिरा प्रियदर्शिनी गांधी सन १९६६ पासून १९७७ पर्यंत सलग ३ वेळा भारताच्या पंतप्रधान राहिल्या आणि त्यानंतर चौथ्या वेळी १९८० पासून १९८४ मध्ये त्यांची राजनैतिक हत्या होईपर्यंत भारताच्या पंतप्रधान राहिल्या. त्या भारताच्या पहिल्या आणि आतापर्यंत एकमेव स्त्री पंतप्रधान राहिल्या. इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी प्रभावी राजकारणी अशा नेहरू परिवारात झाला. त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू आणि आई कमला नेहरू होत्या. फिरोज गांधींशी विवाह केल्यानंतर त्यांना गांधी हे आडनाव मिळाले. मोहनदास करमचंद गांधीशी त्यांचे कोणत्याही प्रकारचे आणि कोणतेही नाते नव्हते. त्यांचे आजोबा मोतीलाल नेहरू एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी नेता होते. त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले होते आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते.
सन १९८० मध्ये सत्तेवर परत आल्यानंतर त्या बहुतेक करून पंजाब मधील अलगाववादिंशी वाढत्या द्वंद्वात व्यस्त राहिल्या ज्यामधूनच पुढे १९८४ मध्ये त्यांच्या अंगरक्षकांनीच त्यांची हत्या केली.