अजित पाल सिंह भारताचे माजी हॉकीपटू राहिले आहेत. अजित सेंटर हाफ या पोझिशनवर खेळायचे. १९७५ साली हॉकी विश्व करंडक विजेत्या संघाचे अजित पाल कर्णधार होते आणि भारत सरकारने १९९२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. त्यांनी १९६८ पासून १९७६ पर्यंत तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. पैकी दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कांस्य पदक पटकावले. भारतीय ऑलिम्पिक संघ (आय.ओ.ए.)ने २०१२ मध्ये कॅप्टन आजीत पाल सिंह यांना लंडन ऑलिम्पिक दलाचे प्रमुख नियुक्त केले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.