कर्णम मल्लेश्वरी भारताची वेटलिफ़्टर आहे. ऑलिम्पिक्स मध्ये कांस्य पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. तिचा जन्म १ जून १९७५ रोजी श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश इथे झाला होता. तिने आपल्या करिअर ची सुरुवात जूनियर वेटलिफ्टिंग चैंपियनशिप पासून केली, जिथे तिने प्रथम स्थान ग्रहण केले. 1992 च्या एशियन चैंपियनशिपमध्ये मल्लेश्वरीने ३ रौप्य पदके जिंकली. तसे पाहता तिने विश्व चैम्पियनशिप मध्ये ३ कांस्य पदके मिळवली आहेत, परंतु तिला सर्वांत मोठी सफलता २००० च्या सिडनी ऑलिम्पिक्स मध्ये मिळाली जिथे तिने कांस्य पदक प्राप्त केले आणि याच पदकासोबत ऑलिम्पिक्स मध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.