दिल्ली कंटोनमेंट, ज्याला सामान्यतः Delhi Cant असे म्हटले जाते, त्याची स्थापना ब्रिटीश - इंडियन आर्मीने केली होती. हा संपूर्ण इलाका एखाद्या छोट्या जंगलासारखा दिसतो. त्याच्यामध्ये चहू बाजूला हिरवीगार झाडे आहेत. म्हटले जाते कि दिल्ली केंट मध्ये पांढरे कपडे घातलेली एक महिला लोकांकडून लिफ्ट मागते. जर तुम्ही तसेच पुढे निघून गेलात तर हि महिला वाहनाच्या वेगाने पळत पाठलाग करते. बऱ्याच लोकांनी तिला पहिल्याचा निर्वाळा दिला आहे. अर्थात अजूनपर्यंत कोणत्याही माणसाला तिने नुकसान पोचवल्याची कोणतीही बातमी नाहीये. लोकांचे म्हणणे आहे कि ती एखाद्या महिला प्रवाशाचा आत्मा असेल, जिचा मृत्यू त्या भागात झालेला असावा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.