अजून एक महत्वाचा धार्मिक पंथ म्हणजे वारकरी पंथ. हा पंथ म्हणजे गोरखनाथांचा नाथ पंथ आणि सिद्धांचा योग ह्याचा मेळ, जे देवाला ज्याचे मूळ स्थान पंढरपूर आहे त्या विठ्ठलाच्या किंवा विठोबाच्या अवतारात पुजायचे. आर्यन, द्रविड आणि वैष्णव, शैव ह्या प्रकारच्या पंथांतील महत्वाच्या संतकवींच्या रचनांसाठी विठ्ठल हा मूळ गाभा होता, ज्ञानदेव किंवा ज्ञानेश्वर(१२७१-९३) हे महत्वाचे होते, ज्यांनी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ९००० कडव्यांची गीतेवरील टीका म्हणजेच ज्ञानेश्वरीसारखे महाकाव्य रचले. त्यांनी देवाच्या नजरेतील माणुसकी, एकता उघड केली, आणि जातव्यवस्था आणि परंपरावादाविरुद्ध बंड पुकारला.
नामदेव (१२७०-१३५०) हे असेच एक महान संतकवी, जातीने शिंपी असलेल्या या संतकवीने मराठी, हिंदी आणि पंजाबीत ( त्यांची ६१ पदं शीख धर्मग्रंथ, आदिग्रंथात सापडतात) कविता रचल्या.
युद्ध आणि दुष्काळामुळे इसवीसन पूर्व १३५० ते १५५० हा काळ एक गडद कालखंड होता. एकनाथ(१५४८-९९) आणि तुकाराम (१५८८-९३) ह्या महान संतकवींनंतर मुक्तेश्वरांनी (१६०८-६०) महाभारताचं भाषांतर केलं. वामनपंडित (१६१५-७८), रघुनाथ पंडित(c-१६५०), श्रीधर(१६७८-१७२८) आणि मयूर पंडित किंवा मोरोपंत(१७२९-९४) हे सर्व प्रख्यात कवी संस्कृतमध्ये माहीर होते आणि ज्यांनी महाकाव्य हे उत्तम दर्जाच्या कसोटीवर तपासले. आत्तापर्यंत मराठी ही बऱ्याच अंशी संस्कृतमय झाली होती आणि केवळ उच्चवर्णीय ब्राह्मणांकडून वापरली जायची. समर्थ रामदासस्वामींनी (१६०८-८२) त्यांच्या दासबोध ग्रंथाने सशक्त आणि आणि स्पष्ट खुणा मांडल्या आणि त्यांचं काव्य त्यांच्या अलंकारांमुळे सर्वसामान्य/ ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.