पहाटेचे स्वप्न तू
दवातला ओलावा ओठास
तुझे नारिंगी ओठ
कधी गोड कधी आंबट
तरीदेखील हवेहवेसे
झोपेत नक्की काय आहे
ते कळले नाही
पण वाटले हा अनुभव
यावा क्षणोक्षणी
पहाटेचे स्वप्न तू
गुलाबाचे फुल तू
सुगंधी, आकर्षक
दुरून पाहूनच
चटकन हात लावावा
असा वाटेलसे
पण का कोण जाणे
थोडी भीती वाटते
नाही काटे टोचण्याची नाही
तर माझ्या राकट स्पर्शाने
पाकळ्या चुरगळून जातील याची
झोपेत नक्की काय आहे
ते कळले नाही
पण वाटले हा अनुभव
यावा क्षणोक्षणी
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.