रोज तोच बस स्टॉप
रोजची तीच बस
रोज तू माझी वाट पाहतेस
माझ्याकड़े पाहून एकदा तरी हस
लाजरी आहेस साजरी वाटतेस
मीही आहे थोडा बुजरा
म्हणुनच परवा
तुझ्यासाठी आणलेला
अबोलीचा गजरा
तसाच आहे पडून माझ्या bag मध्ये
सुकलाय थोडासा पण
अजून पूर्णपणे कोमेजला नाही
तुझ्या केसात माळल्याशिवाय
तुझा गंध त्याच्या सुगंधात
मिसळल्याशिवाय
मरणार नाही, कोमेजणारहि नाही
अबोलीचा गजरा आणि आपलं अबोल प्रेम
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.