रखरखीत उन्हाळा
टळटळीत दुपार
तप्त झळा
सूर्यदेव क्रोधीत
बाहेर पडणं अशक्यच
खरतर.... नकोसं
मी सोफ्यावर
माझ्यावर एसीचा ब्लो
थंड.... सुखद....
NEWS CHANNEL म्हणे
राज्यात कुठेतरी पाउस
बरं वाटलं..
खिडकीतून समोर
एका construction site वर
काम चालूच...अखंड...
त्याच तप्त झळा सोसत..
माझ्यासाठी...
तुमच्यासाठी..
ज्यांना परवडतं..
त्या सगळ्यांसाठी
Well furnished flats
बांधतो तो ..
आग सोसून ..
आपल्या पोटाची आग विझवतो
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.