आज शुभ्र हत्ती पाहायला मिळत नाहीत. मनुष्याने चरबी आणि हस्तिदंत यांच्यासाठी त्यांची कत्तल केली आहे. आता ही प्रजाती लुप्त झाली आहे.
हत्ती शांत, समजूतदार आणि तीक्ष्ण बुद्धीचे प्रतिक आहे. ऐरावत चार सुळेवाला म्हटला गेला आहे. इरा चा अर्थ पाणी. म्हणून इरावत (समुद्रातून) उत्पन्न हत्ती असल्याने त्याचे नाव ऐरावत ठेवले आहे.
महाभारत, भीष्म पर्वाच्या आठव्या अध्यायात भारतवर्षापासून उत्तरेच्या भूभागाला उत्तर च्या ऐवजी ऐरावत म्हटलेले आहे. जैन साहित्यामध्ये देखील हेच नाव आहे. हे उत्तर कुरु प्रत्यक्षात उत्तर ध्रुवावर होते. संभावना आहे की तिथे प्राचीन काळी अशा प्रकारचे हत्ती असावेत जे अत्यंत शुभ्र आणि चार सुळे असलेले असावेत. वैज्ञानिक म्हणतात की साधारण ३५००० वर्षांपूर्वी उत्तर ध्रुवावर बर्फ नव्हे तर मानवांची आबादी होती.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.