कौस्तुभ मणी भगवान विष्णू धारण करतात. कौस्तुभ मणीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली होती. पुराणांप्रमाणे हा मणी समुद्र मन्थनाच्या वेळी प्राप्त झालेल्या १४ रत्नांपैकी एक होता. हा अतिशय कांतिमान मणी आहे. हा मणी जिथे असेल तिथे कोणत्याही प्रकारची दैवी आपत्ती येत नाही. हा मणी सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करतो. अशी मान्यता आहे की समुद्राच्या तळाशी आणि पाताळात आजही हा मणी सापडतो.
चंद्रकांत मणी
भारतात चंद्रकांत मणीच्या नावावर आता त्याचे उपरत्न केवळ मिळते. हा मणी धारण केल्याने भाग्य उजळते. कोणत्याही प्रकारच्या गंभीर दुर्घटनांपासून रक्षण होते. याच्यामुळे वैवाहिक जीवन देखील सुखकर व्यतीत होते. चंद्रकांत मणीचे उपरत्न पाण्याप्रमाणे निर्मळ आणि स्वच्छ असते. हे चंद्राशी संबंधित रत्न आहे. अशी मान्यता आहे की अस्सल चंद्रकांत मणी ज्याच्याकडे असेल त्याचे आयुष्य एखाद्या चमत्काराप्रमाणे बदलून जाते. म्हणजे त्याचे भाग्य अचानक उजळून निघते. या मणी प्रमाणेच त्याचे जीवन चमकू लागते. त्याच्या प्रत्येक प्रकारच्या इच्छा पूर्ण होऊ लागतात. असे म्हणतात की झारखंड मधील बैजनाथ मंदिरात चंद्रकांत मणी आहे. कुबेराची राजधानी अलकापुरी मधून राक्षसराज रावणाद्वारे इथे मणी जडित करण्यात आला होता. सुश्रुत संहितेत चंद्र किरणांचा एक उपचार म्हणून उल्लेख केलेला आढळतो ज्यामध्ये प्रमुख आहे अद्भुत चंद्रकांत मणीचा उल्लेख. या मणीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे याला चंद्रप्रकाशात ठेवल्यास त्यामधून पाणी गळू लागते. या पाण्यात अनेक अद्भुत औषधी गुण असतात. रक्षोघ्नं शीतलं हादि जारदाहबिषापहम्।चन्द्रकान्तोद्भवम् वारि वित्तघ्नं विमलं स्मृतम्।। अर्थात चंद्रकांत मणीमधून उत्पन्न झालेले जल किटाणूंचा नाश करणारे असते. शीतल, आल्हाददायक, ज्वरनाशक तसेच दाह आणि विष यांना शांत करणारे असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel