http://img.punjabkesari.in/default.aspx?img=http://static.punjabkesari.in/multimedia/2015_7image_18_19_00210645300-ll.jpg&width=300

श्रीलंकेच्या रामायण संशोधन कमिटीने रावणाचे रामायण काळातील ४ हवाई अड्डे शोधण्याचा दावा केला आहे. मागील ९ वर्षांपासून ही कमिटी श्रीलंकेचा कानाकोपरा धुंडाळत होती ज्यातून अनेक छोटे छोटे अवशेष आणि माहिती मिळत होती परंतु मागील ४ वर्षांत लंकेत दुर्गम भागात केलेल्या संशोधनाच्या दरम्यान रावणाचे ४ हवाई तळ हाती लागले आहेत.
कमिटीचे अध्यक्ष अशोक केंथ यांचे म्हणणे आहे की रामायणात वर्णिलेली लंका प्रत्यक्षात श्रीलंकाच आहे जिथे उसानगोडा, गुरुलोपोथा, तोतुपोलाकंदा आणि वरियापोला नावाचे ४ हवाई तळ मिळाले आहेत. उसानगोडा रावणाचा खाजगी हवाई अड्डा होता आणि इथल्या रनवेचा रंग लाल आहे. त्याच्या आसपासची जमीन कुठे काळी तर कुठे हिरवे गावात उगवलेली आहे. जेव्हा हनुमान सीतेच्या शोधात लंकेला गेला तेव्हा तिथून परतत असताना त्यांनी रावणाचा खाजगी उसानगोडा हवाई तळ नष्ट केला होता.
केंथ यांनी पुढे सांगितले की आतापर्यंत त्यांच्या टीमने लंकेतील ५० दुर्गम ठिकाणांवर संशोधन केले आहे. यापूर्वी पंजाबचे अशोक केंथ २००४ मध्ये लंकेत असलेली अशोक वाटिका शोधून काढण्यासाठी चर्चेत आले होते.
अशोक केंथ यांनी सांगितले की श्रीलंकेत बौद्ध धर्माला मानणारे बहुसंख्य लोक असून देखील आजही तिथे माता सीतेचे नाव फार आदराने घेतले जाते. एवढेच नव्हे तर श्रीलंकेच्या जनतेबरोबरच तिथले सरकार देखील मानते की माता सीता तीच व्यक्ती होती जी सर्वप्रथम विमानाने (पुष्पक) भारतातून श्रीलंकेला आली होती आणि त्या विमानाचा पायलट महाराज रावण होता. हेच कारण आहे की आजही श्रीलंकेच्या सर्वांत पहिल्या विमानसेवेचे नाव सीता एयरलाईन्स च्या नावानेच ओळखण्यात येते. श्रीलंकेमध्ये ज्या सोन्याच्या लंकेत विश्वातील सप्तद्वीपांचा राजा रावण राहत होता, ती तर बुडून गेली आहे परंतु श्रीलंकेचा ६०% हिस्सा अजूनही रावणाच्या आठवणी ताज्या करतो. इथे शोधण्यात आलेली ठिकाणे कमीत कमी एवढे तरी प्रमाणित करतातच की रामायण काळातील लंका ही प्रत्यक्षात श्रीलंकाच आहे. श्रीलंकेत रामायण काळाशी निगडीत अनेक स्थानांना शोधण्यात येत आहे. श्री रामायण रिसर्च कमिटी द्वारे मागील ४ वर्षातील संशोधन करण्यात आलेल्या ५० च्या जवळपास ठिकाणांमध्ये रावणाचे हवाई तळ देखील मिळाले आहेत. श्री रामायण रिसर्च कमिटी द्वारे शोधण्यात आलेल्या अशोक वाटीकेसोबत एक महत्वाचे स्थान असेही आहे जे ऐकून अक्षरशः विश्वास ठेवणे कठीण जाते. ते स्थान आहे रावणाचे हवाई तळ. लंका नगरीत रावणाचे ५ हवाई तळ असल्याचा दावा करण्यात येत आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel