बहुतेक लोकांना असे माहिती आहे की महाभारत वेदव्यास यांनी लिहिले आहे परंतु हे अर्धसत्य आहे. वेदव्यास एखादे नाव नाही तर उपाधी होती, जी वेदांचे ज्ञान असणाऱ्या लोकांना दिली जात असे. कृष्णद्वैपायनच्या आधी २७ वेदव्यास होऊन गेले होते, तेव्हा ते स्वतः २८ वे वेदव्यास होते. त्यांचे नाव कृष्णद्वैपायन अशासाठी ठेवण्यात आले की त्यांचा रंग सावळा (कृष्ण) होता आणि ते एका द्वीपावर जन्माला आले होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.